महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण

गणित प्रावीण्य परीक्षेत फाटक हायस्कूलचे यश

रत्नागिरी : गणित प्रावीण्य परीक्षेमध्ये फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. इयत्ता पाचवीमधील पाच विद्यार्थ्यांनी व आठवीमधील तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. हे विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.

रत्नागिरी : फाटक हायस्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापक राजन कीर व शिक्षक.


पाचवीतील वरद गावखडकर, मानस सुर्वे, रुद्र सरदेसाई, अर्नेश कदम, आरोही ढाणे यांनी यश मिळवले. आठवीमधील मुक्ता बापट, गौराई महाकाळ, राजमुद्रा मोंडकर यांनी यश मिळवले.
या विद्यार्थ्यांना श्रावणी जोशी व प्रीति हातिसकर यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक राजन कीर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.


Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button