महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
लांजा-दाभोळे मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी ; तहसीलदारांना निवेदन

लांजा : लांजा- दाभोळे रस्त्याची अवजड वाहनांमधून होत असलेल्या चिरा वाहतुकीमुळे झालेली दुरवस्था व होणारे अपघात या संबंधी तहसीलदार प्रमोद कदम यांना बुधवारी सामजिक कार्यकर्ते नंदकुमार शशिकांत पाटोळे आणि प्रकाश एकनाथ पाटोळे यांनी दिले आहे.
या रस्त्यावर अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. गेले अनेक दिवस या मार्गावर सातत्याने वाहन अपघात होत आहेत. गेल्या चार महिन्यात चार बळी या मार्गावर गेले आहेत. या मार्गावर शालेय विद्यार्थी, कर्मचारी नागरिक दुचाकी यांनी ये जा करीत असतात. अवजड वाहने यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याची शक्यता आहे. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी या मार्गावर चिरे वाहतूक, जड वाहतूक बंद करण्याबाबत हे निवेदन देण्यात आले आहे.