ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या दूर पल्ल्याच्या गाड्यांना जादा डबे

रत्नागिरी : हिवाळी पर्यटन हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना गर्दी वाढल्याने या मार्गावरील दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांना जादा डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पोरबंदर ते कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीला (20910) दिनांक ७ डिसेंबर 2023 च्या फेरीसाठी तर कोचुवेली ते पोरबंदर या मार्गावरील फेरीसाठी (20909) दिनांक 12 डिसेंबर रोजी स्लीपर चा एक जादा डबा जोडला जाणार आहे.
याचबरोबर सुरत जवळील उधना ते मंगळूरू दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला (09057) या गाडीला दिनांक आठ डिसेंबर तर मंगळुरू ते उदना विशेष गाडीला (09058) दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी च्या फेरीसाठी स्लीपर श्रेणीचे दोन जादा डबे जोडले जाणार आहेत.