शिरवली-व्हेळ परिसरात गवा रेड्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
गतवर्षाची नुकसान भरपाई अद्यापही नाही : दीपक मोडक
लांजा : लांजा तालुक्यातील शिरवली, व्हेळ या गावात गवा रेड्यांच्या मुक्त संचारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेली दोन वर्षे या भागात गवाररेड्यांचा संचार सुरू आहे.
तालुक्यात भातशेती लागवड झाली आहे. या भातशेतीतून गवा रेड्यांची भ्रमंती सुरू असल्याने नुकसान होत आहे. गतवर्षी शिरवली गावात काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. विलवडे ते शिरवली या रस्त्यावरून गवा रेडे फिरत असल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी शेतकरी जीव मुठीत घेऊन जात आहेत.
सध्या शेतीचा हंगाम सुरू झाल्यानंतर आंबा घाटातून गवारेडे पूर्व भागात खाली येतात. गतवर्षी वन विभागाला या संदर्भात खबर देण्यात आली होती. नुकसानीचे पंचनामे झाले परंतु संबंधित शेतकऱ्याला अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही या गावचे सामाजिक कार्यकर्ते दीपक मोडक यांनी गवारड्यांचा बंदोबस्त करावा, असे मागणी केली आहे.
दरम्यान, तळवडे , वेरळ या जंगल भागात गवारेडे मुक्तपणे फिरत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सागितले.