रत्नागिरी अपडेट्स
संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथील बाप्पाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन!
रत्नागिरी : फाल्गुन वद्य चतुर्थी (संकष्टी चतुर्थी) निमित्त रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रकिनारी वसलेल्या बाप्पाचे शनिवारी हजार भाविकांनी दर्शन घेतले. शिमगोत्सवाच्या सुट्टीमुळे मोठ्या प्रमाणावर कोकणात गावी आलेले असल्यामुळे श्रींच्या भक्तांनी शनिवारी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली.
या निमित्त मंदिरात श्रींच्या गाभाऱ्यासमोर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. गणपतीपुळे देवस्थानचे मुख्य पुजारी श्री. अभिजीत घनवटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी फुलांची आकर्षक आरास केली होती. संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी होणार, हे लक्षात घेऊन देवस्थानने दर्शनासाठी चोख व्यवस्था ठेवली होती. त्यामुळे दूरवरून आलेल्या हजारो भाविकांनी श्रींचे मनोभावे दर्शन घेतले.