महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूज
सावधान ! बीएसएनएलच्या नावाने सीम ब्लॉक करण्याचे येत आहेत फोन, मेसेज आणि नोटीससुध्दा
रत्नागिरी ३१ : भारत संचार निगम लिमिटेडच्या अर्थात बीएसएनएलच्या नावाने वापरकर्त्यांना केवायसी लिंक करा अन्यथा तुम्ही वापरत असलेले सीम कार्ड 24 तासाच्या आत ब्लॉक करण्यात येईल, असे मेसेज, फोन आणि व्हॉट्स ॲपवर नोटीस देखील येत आहेत. परंतु, हा फसवणुकीचा प्रकार आहे.
बीएसएनएल अशी कोणतीही माहिती मागत नाही, कृपया अशा फोन, मेसेज व नोटीसला दुर्लक्षीत करावे. यात दिलेल्या क्रमांकाला कोणताही संपर्क करु नये. वापरकर्त्यांनी नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन बीएसएनएलचे उपप्रबंधक अरुण चवळी यांनी केले आहे.