ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ रत्नागिरीत आम आदमी पक्षातर्फे उद्या रक्तदान
रत्नागिरी : आम आदमी पक्षाचे संस्थापक श्री. अरविंद केजरीवाल यांना ई. डी. कडून झालेल्या अटकेच्या निषेधार्थ गुरूवार, दि. २८ मार्च रोजी स. १० ते दु. २ या वेळेत जिल्हा रुग्णालय रक्तपेढी व रेडक्रॉस रक्तपेढी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरासाठी नाव नोंदणी करण्यासाठी 9322626756 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने रक्तदान करून निषेध व्यक्त करावा, असे आवाहन आम आदमी पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष परेश साळवी यांनी केले आहे.