आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू शरद वझे लांजातील विद्यार्थ्यांसोबत बुद्धिबळात रमले!
शंभरपेक्षा जास्त खेळाडुंबरोबर बुद्धिबळ खेळण्याचा कार्यक्रम
लांजा : बुद्धिबळाच्या प्रसारासाठी कार्यक्रमामधील एक भाग म्हणून प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू श्री शरद वझे याचा दहा हजार खेळाडुंबरोबर खेळण्याचा टप्पा रविवारी ४ ऑगस्ट रोजी कै. एकनाथराव राणे हायस्कूल, लांजा, रत्नागिरी येथे सलग सहा तास १०६ खेळाडुंबरोबर खेळून पार पडला.
लांजा येथील कैलासवासी एकनाथ राणे मीडियम स्कूलमध्ये रविवारी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय खेळाडू शरद वझे यांनी आपल्या बुद्धिबळ खेळाचे कौशल्य विद्यार्थ्यांसमोर सादर केले.
आजपर्यत भारतातील 8 राज्यांमधील 129 पेक्षा जास्त संस्थांमधील 9970 पेक्षा जास्त खेळाडूनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात भाग घेतला. आहे. विश्वनाथ आनंद 2007 मध्ये बुद्धिबळ विश्वविजेता झाल्यानंतर बुद्धिबळ प्रसारासाठी एक आगळावेगळा कार्यक्रम हातात घेतला आहे. ज्यामध्ये शरद वझे हे एकटे शंभरपेक्षा जास्त खेळाडुंबरोबर बुद्धिबळ खेळतात. मुख्यत्वे पहिली ते दहावीचे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यासाठी हा सुपरफास्ट कार्यक्रम आहे.
खेळाडुंसाठी विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमात एका तासात वीस असे पाच ते सहा तासात शंभरपेक्षा जास्त खेळाडुंबरोबर एकाचवेळी ते बुद्धिबळ खेळतात. आजपर्यत भारतातील 8 राज्यांमधील 130 पेक्षा जास्त संस्थांमधील 10076 पेक्षा जास्त खेळाडूनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात भाग घेतला आहे. लांजात झालेल्या या कार्यक्रमात राणे मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा राणे, कौस्तुभ राणेआणि शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. शरद वझे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बुद्धिबळ खेळाचा सर्व शाळांमध्ये प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे, बुद्धिबळ खेळणे हे सर्वांगण विकासासाठी महत्त्वाचे आहे. शरद वझे हे चेस चॅलेंजर अकॅडमीचे संस्थापक आहेत.