महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयराष्ट्रीयलोकल न्यूज
आता कांदळवन संरक्षणासाठी शेतकऱ्यांना देणार कार्बन क्रेडिट

मुंबई : समुद्रकिनारी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अथवा वैयक्तिक जागेत असलेल्या कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना ताकद दिली जाईल. अशा जागांमधील कांदळवनांच्या संरक्षणाकरिता ‘कार्बन क्रेडिट’ देण्याबाबत शासनाकडून सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
गुजरातपासून ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत राज्याच्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनांचे वनविभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू आहे. यामुळे लवकरच #कांदळवन च्या अचूक क्षेत्रफळाची माहिती मिळणार आहे, असे वनमंत्री ना. नाईक यांनी सांगितले.