आधुनिक आव्हानांचा चक्रव्यूह भेदण्यासाठी गर्भसंस्कार महत्त्वाचे : वैद्या मंजिरी जोग
- ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने गर्भसंस्कार उपलब्ध
रत्नागिरी : सुमारे वर्षभरापासून रत्नागिरीकरांच्या सेवेत अंकुर गर्भसंस्कार केंद्र दाखल झालं आहे. रत्नागिरीतील २५ मातांनी या गर्भसंस्कार केंद्राचा आतापर्यंत लाभ घेतला आहे. टिळक आळी येथे सुरू असलेल्या या गर्भसंस्कार केंद्राचं आता संगम स्वीट मार्टच्या वरती, मारुती मंदिर जोशी कॉम्प्लेक्स येथे स्थलांतर झालं आहे. या स्थलांतराच्या निमित्ताने वैद्य मंजिरी जोग यांनी आधुनिक काळातल्या बदलत्या आव्हानांना सक्षमपणे तोंड देण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या गर्भसंस्कारांचं महत्त्व अधोरेखित केलं.
बाळ मातेच्या पोटात वाढत असतानाच केलेले गर्भसंस्कार हे त्याच्या आयुष्यभराची पायाभरणी असते अस त्या म्हणाल्या. मातेची प्रत्येक कृती बाळावर परिणाम करत असते असं संशोधनाने सिद्ध झालं आहे. यामुळेच गर्भसंस्कार करणे अत्यंत उपयुक्त ठरते असं शास्त्र सांगतं. मातांचं प्रकृती परीक्षण करून त्यांचं वय, गर्भाची अवस्था यानुसार आयुर्वेद, पंचकर्म, आहार, योग आणि संगीतोपचार या पंचसूत्रांच्या साह्याने हे गर्भसंस्कार केले जातात. प्रत्येक मातेच्या गरजेनुसार आवश्यक ते संस्कार दिले जातात. अशा या गर्भ संस्कारामुळे आम्हाला खूप फायदा झाला असल्याचं गेल्या वर्षभरात हे संस्कार घेतलेल्या मातांनी आवर्जून सांगितल आहे. तीस वर्ष आयुर्वेदिक वैद्यकीय सेवेचा अनुभव असलेल्या वैद्या मंजिरी जोग यांनी एनआयए जयपूर या संस्थेने उपलब्ध करून दिलेले गर्भसंस्कारांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं आहे.
आताच्या काळात विभक्त कुटुंबपद्धती लांबच्या शहरात असणारी नोकरी यामुळे घरापासून दूर जाणारे तरुण तरुणी जेव्हा बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतात तेव्हा या बाळावर गर्भातच संस्कार करणं अधिक उपयुक्त ठरतं. गर्भसंस्कारंबरोबरच प्रसूती पश्चात बाळाचं संगोपन करताना आवश्यक असणारं प्रत्येक बारीक सारीक गोष्टीसाठी लागणारं मार्गदर्शन देखील वैद्या मंजिरी जोग करतात.
प्रसूती होण्यापूर्वी मातांवर असणारा मानसिक ताण हा बाळावरही येत असतो. या ताणतणावाचं व्यवस्थापन करता येणंही आवश्यक असतं. अशा अनेक गोष्टींचे फायदे या गर्भसंस्काराच्या दरम्यान माता आणि बाळ या दोघांना मिळत असतात. अत्यंत नाममात्र शुल्कात ही सेवा उपलब्ध असून आनंददायी मातृत्वासाठी, सुदृढ बाळाचे स्वप्न साकारण्यासाठी रत्नागिरीतील इच्छुक मातांनी या अंकुर गर्भसंस्कार केंद्राशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.