‘आपले सरकार’ सेवा केंद्रांसाठी इच्छुकांनी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. २४ : जिल्हयातील रिक्त झालेल्या 6 ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यासाठी इच्छुक व्यक्तीने विहित नमुन्यातील अर्ज माहिती तंत्रज्ञान विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे सादर करावा. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दिनांक 25/01/2024 ते 31/01/2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावेत अथवा ditratnagiri@gmail.com यावर अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
- तालुका दापोली – केळशी,
- खेड– धामणी व बिजघर,
- रत्नागिरी – कर्ला सिटी, रत्नागिरी (म्यु.),
- राजापूर- देवाचे गोठणे
पात्र/अपात्र उमेदवारांची यादी पुढील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. www.ratnagiri.nic.in उपरोक्त आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय
रत्नागिरी (माहिती तंत्रज्ञान विभाग) येथे कार्यालयीन वेळेत व प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह 31/01/2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यत सादर करावेत. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जासोबत सादर करावयाचे पुरावे- आधार कार्ड, पॅन कार्ड, संगणकीय प्रमाणपत्र (MSCIT/Equivalent), शैक्षणिक अर्हता 12 व त्यापुढील, CSC धारक असल्यास त्यासंबंधित
प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) आपले सरकार सेवा केंद्र चालवण्याबाबत सर्वसाधारण अटी व शर्ती खालीलप्रमाणे –
- केंद्र मंजूर ठिकाणीच चालविण्यात यावे अन्यथा इतर ठिकाणी आढळून आलेस त्यांच्यावर
कार्यवाही करणेत येईल. - शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केंद्र चालू ठेवून नागरिकांना सेवा
- शासनाने ठरवून दिलेल्या ब्रेडिंग चा वापर करणे तसेच महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान महामंडळाने
स्थापन केलेल्या हेल्पलाईन क्रमांकाचा तपशील आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्शनी भागावर
प्रसिद्ध करणे तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकरणी न करणे. - सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणूक देणे आणि आवश्यक मदत व सहकार्य करणे,
- विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत ठरवून दिलेल्या वेळापत्रक व निर्देश काटेकोरपणे
पाळणे. - आपले सरकार मेवा केंद्र साठी अर्ज करणारा नागरिक हा त्या गावातील रहिवासी असावा. जर
त्या गावातील नागरिकाचा अर्ज आला नसेल तर जवळच्या गावातील रहिवासी असलेल्या अर्जाचा
विचार करणेत येईल. - अर्ज सादर करताना अर्जदाराने सर्व आवश्यक कागदपत्राच्या छायांकित प्रती अर्जासोबत सादर
करणे बंधनकारक राहील, त्यानंतर अर्जदाराकडून कोणतीही कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही. - नागरिक फक्त एकच आपले सरकर सेवा केंद्र साठी अर्ज करु शकतात. त्याच्या कुटुंबातील
दुसरा अर्ज प्राप्त झाल्यास तो ग्राहय धरला जाणार नाही. - अर्जामध्ये माहीती चुकीची आढळल्यास अर्ज रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही
करणेत येईल. - आपले सरकार सेवा केंद्राना शासनाने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी देण्यात
येणा-या निर्देशांचे पालन करावे लागेल, तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी
वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागेल. - प्रस्तावित आपले सरकार सेवा केंद्रांच्या गावामध्ये केंद्र देण्याबाबतचे किंवा केंद्र रद्द
करण्याबाबतचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती, रत्नागिरी यांनी
राखून ठेवले आहेत. - जाहिरातीत दर्शवलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांच्या ठिकाणामध्ये भविष्यात बदल होण्याची
शक्यता आहे. एका केंद्राला एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास योग्य पर्यायाच्या आधारे
उमेदवाराची निवड करणे याबाबतचे सर्वअधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती,
रत्नागिरी यांनी राखून ठेवले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी घेतलेला निर्णय
अंतिम राहील. याबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही. - वरील निवेदिबाबत काही अडचणी असल्यास आवश्यक माहितीसाठी 8087591934 या
भ्रमणध्वनी क्रमांकावरती संपर्क साधावा.