आबिटगाव येथे कृषिदिन उत्साहात साजरा

- गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील ‘कृषी उमेद’ कृषीकन्या संघाचा उपक्रम
आबिटगाव (चिपळूण) : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील’ कृषी उमेद’ कृषिकन्या संघातील कृषीकन्यांद्वारे आबिटगाव येथे कृषीदिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास चित्रकला स्पर्धेसाठी मुख्य अतिथी आबिटगांवचे सरपंच सुहास भागडे, उपसरपंच दीपक भागडे, ग्रामसेविका साधना शेजवळ व इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा ते मूर्तवडे फाटा बाजारपेठेपर्यंत ढोल ताशांच्याच्या गजरात ‘जय जवान , जय किसान’ अशा घोषणा कृषीदिंडी काढण्यात आली.
कृषीदिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या चित्रकला निबंध व वक्तृत्व स्पर्धाचे प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षिस वितरण तसेच वृक्षारोपण करण्यात झाले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण कृषिकन्या अनुजा माने आणि वैष्णवी शिर्के
यांनी शेतकऱ्याच्या जीवनशैलीवर प्रहसन सादर केले. विद्यार्थीवर्ग, प्रमुख अतिथी यांच्या समवेत कृषिदिन साजरा करण्यात आला.