आबिटगाव येथे कृषी कन्यांकडून ‘कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र’ उपक्रम

चिपळूण : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण येथील चतुर्थ वर्षातील कृषिकन्यांकडून आबिटगाव येथे “कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र ” हा उपक्रम राबविण्यात आला.
शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी आबिटगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कृषी कन्यांकडून ‘कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश कृषी उत्पादनात वाढ घडविणे, कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे असा होता.
शेतकऱ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोनातून आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, उत्पादन क्षमता वाढावी, शेती अधिक शाश्वत व्हावी या उद्देशाने घेण्यात आलेल्या “कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र “या उपक्रमास गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमामध्ये शाळा समिती व्यवस्थापनाचे अध्यक्ष श्री. काशिराम भागडे, सरपंच श्री.सुहास भागडे, माजी सरपंच श्री. बाळाराम भागडे ,ग्रामसेवक सौ.साधना शेजवळ व शाळेचे मुख्याध्यापक श्री.काजरोळकर सर ,त्यांचे सहकारी शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभलेले गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संकेत कदम यांनी गावकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी नव्या युगाची सुरुवात ठरत असून त्यातून विज्ञानाधारित आणि नफ्याची शेती घडवण्याची दिशा निश्चित झाली आहे असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठीचे मार्गदर्शन ही कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.निखिल चोरगे ,जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रशांत इंगवले व श्री. अनिल कांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अमिषा कोळी , वृषाली गोफणे, प्रज्ञा गोठणकर, साक्षी गुरव, साक्षी अवतार, सृष्टी काळे, दिक्षा खांडेकर ,मयुरी ढेकळे, प्रीती पेरवी, मृणाल उपाध्ये या कृषी कन्यांचे सहकार्य लाभले.