आबिटगाव येथे कृषी कन्यांकडून ‘शाश्वत शेती दिन’ उत्साहात साजरा

चिपळूण : डाॅ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण येथील चतुर्थ वर्षातील कृषी कन्यांकडून प्रसिद्ध कृषी वैज्ञानिक डॉ .एम.एस. स्वामीनाथन यांची जयंती आणि शाश्वत शेती दिन आबिटगाव येथे उत्साहात साजरा केला.
डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी हरितक्रांती घडवून भारतात अन्न सुरक्षा निर्माण केली. त्यांना आधुनिक भारतीय शेतीचा पाया मानले जाते. या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्म शताब्दी निमित्त दि. 7 ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्र शासनाने ‘शाश्वत शेती ‘ दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली व त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी ‘शाश्वत शेती ‘ दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले . त्यानंतर कृषी कन्यांनी सुद्धा या दिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना शाश्वत शेतीचे महत्व समजवणे, पर्यावरण पूरक शेतीस प्रोत्साहन देणे आणि डॉ. स्वामीनाथन यांचे प्रेरणादायी कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा होता.
सदर कार्यक्रमासाठीचे मार्गदर्शन हे कृषिभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शमिका चोरगे, ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रशांत इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सृष्टी काळे, प्रज्ञा गोठणकर, साक्षी गुरव, साक्षी अवतार, वृषाली गोफणे, मृणाल उपाध्ये या कृषिकन्यांचे सहकार्य लाभले