आमदार डॉ. राजन साळवी यांच्या चौकशीबाबत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा रत्नागिरीत एल्गार

हजारो ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची एसीबी कार्यालयावर धडक
रत्नागिरी, दि.22: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा आमदार डॉ. राजन साळवी यांना व त्यांचे मोठे बंधू दीपक साळवी यांना पुन्हा एसीबीने चौकशीसाठी 22 जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले असता आमदार डॉ.राजन साळवी यांच्या समवेत जिल्ह्यातील हजारो ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मारुती मंदिर येथील रत्नागिरीतील एसीबी कार्यालय धडक दिली.
दोन दिवसांपूर्वी आ. राजन साळवी यांच्या घरासह कार्यालय येथे एलसीबीने छापे टाकले होते. त्यांच्यासह पत्नी व मुलावर गुन्हे दाखल केले गेले.
यामुळे रत्नागिरीत राजकीय वातावरण तापलेले असतानाच पुन्हा एकदा आज रोजी आमदार डॉ.राजन साळवी व त्यांचे बंधू दीपक साळवी यांना एसीबीने रत्नागिरीतील कार्यालयात चौकशीसाठी बोलावले असल्याने जिल्हाभरातून हजारो शिवसैनिकानी रत्नागिरीत येऊन सरकारचा जाहीर निषेध करत आमदार डॉ.राजन साळवी यांना पाठींबा दिला.