ईगल तायक्वांदोच्या खेळाडूंचं नगरसेवक राजीव कीर यांच्याकडून कौतुक

रत्नागिरी : अभ्युदय नगर नाचणे रोड येथे होणाऱ्या ईगल तायक्वांदोच्या खेळाडूंनी बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये सुयश मिळवल्याबद्दल नवनिर्वाचित नगरसेवक श्री. राजीव कीर यांनी कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक श्री. राजीव कीर यांनी अभ्युदय नगर बहुउद्देशीय सभागृह नाचणे रोड येथे घेतल्या जाणाऱ्या ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. या ठिकाणी प्रशिक्षण घेत असणाऱ्या खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत उत्तम यश मिळवलं. यामध्ये वैष्णव रोहित कार्लेकर आणि कशिश अभय जैन यांनी येलो बेल्ट मिळवला तर नायशा मयूर कांबळे हिने ब्लू वन बेल्ट मिळवला. प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत आणि सई संदेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे उत्तम यश संपादन केलं आहे. याबद्दल नगरसेवक श्री. राजीव कीर यांनी तसंच त्यांच्या पत्नी सौ. प्राची राजीव कीर आणि उपशहर प्रमुख सौ. प्रिया प्रकाश साळवी तसेच सर्व सहकारी यांनी या खेळाडूंच अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ईगल तायक्वांदो केंद्रास भविष्यात कोणतीही मदत लागल्यास सदैव पाठीशी राहू असं आश्वासनही त्यांनी दिलं. संकेता संदेश सावंत आणि सई संदेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्राचा आजूबाजूच्या परिसरातील मुलांनी अवश्य लाभ घ्यावा आणि सध्या काळानुसार आवश्यक असणार स्वसंरक्षणाच हे प्रशिक्षण अवश्य घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.





