उदय सामंत यांच्या प्रचारात भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते नेते कार्यकर्ते पदाधिकारी सक्रिय
रत्नागिरी : रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय बळीराज सेना अर्थात महायुतीचे अधिकृत उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जुन्या-जाणत्या नेत्यांनी सक्रिय आघाडी घेतली आहे. भाजपच्या युवा मोर्चा, महिला मोर्चा, बेसिक कार्यकारणी, विविध प्रकोष्टच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी उदय सामंत यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याने महायुती भक्कम असल्याचे पुढे आले आहे.
गेले पंधरा दिवस भाजप आणि शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण करण्याचे षडयंत्र विरोधक आणि भाजप सोडून विरोधकांमध्ये सामील झालेल्या बाळ माने यांच्याकडून होत होते. भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी माझ्यामागे असल्याचे भासवले जात होते. मात्र भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि जुन्या जाणत्या नेत्यांनी एकत्र येत उदय सामंत यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांच्याबरोबरच राजापूर लांजा साखरपा मतदार संघातही भाजप सक्रियपणे किरण सामंत यांच्या प्रचारात उतरला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.
रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात जे भाजपचे नेते सक्रिय झाले आहेत त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश शेवडे, ज्येष्ठ नेते नाना शिंदे, शिल्पाताई पटवर्धन, ऍड. विलास पाटणे, बाबासाहेब परुळेकर, ऍड. दीपक पटवर्धन, राजन फाळके, उमेश कुलकर्णी यांच्यासह अन्य कार्यकर्ते पदाधिकारी नेते समावेश आहे.