उद्योगमंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस पाली येथील विविध कार्यक्रमांनी साजरा
नाणीज : राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस पाली येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त मान्यवरांचे सत्कार, अनेक सामाजिक व वैद्यकीय उपक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम झाले.
मंत्री सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त येथे ‘सन्मान कर्तृत्वाचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पाली हातखंबा, हरचेरी विभागातील मान्यवर व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. महिला उद्योजिका तृप्ती शिवगण, सैन्य दलातून निवृत्त झालेले वेळवंड गावचे सुपुत्र मंगेश मोहिते, अनेक आदर्श प्रयोगशील व उद्यमशील शेतकरी, क्रीडा क्षेत्रात राज्य स्तरावर यश प्राप्त करणारे खेळाडू, इस्त्रो मध्ये निवड झालेले विद्यार्थी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ति, चरवेली, वेळवंड, साठरेबांबर, वळके या गावातील नवनिर्वाचित सरपंच, ग्रा.प. सदस्य अश्या मान्यवर व्यक्तींचा त्यांच्या क्षेत्रातील आदर्शवत, यशस्वी कारकिर्दीबद्दल सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमात त्यानंतर पाली येथील युवा मंचच्या वतीने उत्सवमूर्ती आमदार उदय सामंतांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना
मंत्री सामंत म्हणाले की, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात पाली येथूनच झाली. त्यामुळे माझ्या जुन्या मित्राने येथे जो माझा वाढदिवस साजरा केला त्यामुळे मी खूप आनंदी झालो आहे.
ते पुढे म्हणाले, ‘ जिल्ह्यातील एकही युवक बेरोजगार राहणार नाही, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.’ याप्रसंगी महिलांनी औक्षण केले.
या सोहळ्याला जिल्हाप्रमुख राहुल पंडित, बाबू माप , सचिन( तात्या) सावंत, मुन्ना देसाई, तुषार साळवी, केतन शेटे गौतम सावंत, शंकर झोरे, सौरभ खाके, विनया गावडे, कांचन नागवेकर, शंकर गोरे, दत्ताराम शिवगण शिवगण, गौरव संसारे, विठ्ठल सेठ सावंत आदींसह सर्व सरपंच उपस्थित होते.
त्यानंतर हिंदी व मराठी सदाबहार गीतांचा कार्यक्रम झाला. शक्तीवाले पूनम आगरकर व तुरेवाले राजेश शिंदे यांचा शक्ती तुरा खेळाचा सामना पहाटेपर्यंत झाला .
हे सर्व कार्यक्रम पालीतील डी. जे. सामंत वरीष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाले . वाढदिवसाच्या अभीष्टचिंतन सोहळा कार्यक्रमांचे आयोजन बाळासाहेबांची शिवसेना हातखंबा, पाली, हरचेरी विभाग, पाली युवासेना, पाली युवा मंच यांनी केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय वेल्हाळ, बोंबले मॅडम, तात्या सावंत यांनी केले.