उरणमध्ये ११ ऑगस्ट रोजी दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन
उरण दि ७ (विठ्ठल ममताबादे ) : रायगडचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार “महसूल सप्ताह” अंतर्गत “एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा” या उपक्रमांतर्गत तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींचे तपासणी शिबीर, प्रमाणपत्र वितरण, इतर अनुषंगिक लाभ देण्याबाबत शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा रुग्णालय रायगडच्या अधिनस्त आरोग्य संस्थांमध्ये दिनांक ०१ ऑगस्ट २०२४ ते १४ ऑगस्ट २०२४ या कालावधीत दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबीरांचे आयोजन करण्यांत येत आहेत.
दिनांक ११/८/२०२४ रोजी उरण तालुक्यातील इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय येथे अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल मधील डॉक्टरांची टीम दिव्यांगाचे ऑनलाईन सर्टिफिकेट काढण्यासाठी येणार आहेत. तसेच तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
ज्यांना ज्यांना दिव्यांगचे ऑनलाईन सर्टिफिकेट पाहिजे असेल त्यांनी तसेच आरोग्य तपासणी साठी दिनांक ११/८/२०२४ रोजी इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय येथे प्रत्यक्ष हजर राहून या शिबिराचा लाभ घ्यावा. असे दिव्यांग सामाजिक संस्था उरण आवाहन करण्यात आले आहे.