कापरे येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयामार्फत ‘कृषी महोत्सव’ उत्साहात


कापरे, ता. चिपळूण : 1 जुलै 2025 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कार्यरत कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी पालवण येथील कृषीदूतांच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून कृषी दिंडी
व वृक्षारोपण समारंभाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा परिषद केंद्र शाळा, कापरे येथे माजी मुख्यमंत्री व कृषीमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी तसेच कृषीदूतांनी भाषणाद्वारे वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करत, कृषी क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना मानवंदना अर्पण केली. शाळेच्या आवारातून ‘कृषी दिंडी’ काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून हातात कृषी जनजागृती फलक घेत विविध घोषणांनी परिसर दुमदुमवला. दिंडी दरम्यान “शेती वाचवा, देश वाचवा”, “शेतीला मान द्या”, “सेंद्रिय शेतीचा स्वीकार करा” यांसारख्या घोषवाक्यांनी ग्रामस्थांमध्ये कृषीप्रती सकारात्मक संदेश दिला.यानंतर वृक्षारोपण समारंभाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या फळझाडे व बहुपयोगी वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाद्वारे पर्यावरण संरक्षण व जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाला सरपंच सुविधा संदीप कदम शाळेच्या मुख्याध्यापिका महाडिक मॅडम,ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी चे मार्गदर्शन हे कृषिभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे , गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम , जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे, ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्राध्यापक प्रशांत इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी कृषी संघर्ष ग्रुपमधील कृषीदूत, कौस्तुभ भायदे, विशाल म्हात्रे,दिप अव्हाड, यश पार्टे,विनित कदम, राजवर्धन पाटील, अक्षय ठोंबरे, गणेश चाचे, सुशांत अवताडे, वरुण वारके यांचा सहभाग लाभला.
- हे देखील अवश्य वाचा : Konkan Railway | दादर- सावंतवाडी राज्यराणीला तुतारी एक्सप्रेस का म्हणतात?
- छोटा भीमचा रेल्वे प्रवाशांना मोठा संदेश!
- पनवेलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सप्टेंबरपासून उड्डाण!