काश्मीरमधून सुखरूप परतलेल्या पर्यटकांची ना. नितेश राणे यांनी घेतली भेट

कणकवली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालेल्या परिसरातून सहीसलामत आपल्या तळेरे गावी आलेले पावसकर कुटुंबियांची भेट मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी त्या ठिकाणच्या परिस्थितीची माहिती घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत डॉ. मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी जि. प. सभापती बाळा जठार, कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, सचिन पावसकर, योगेश पावसकर, सागर पावसकर, दिनेश मुद्रस, कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे आदी उपस्थित होते.
पहलगाम येथे ईस्लामी आतंकवादी हल्ल्यात 26 निरपराध हिंदूंची हत्या केली. या हल्ल्या दिवशी सकाळीच पहलगाम येथून दुसऱ्या ठिकाणी तळेरे येथील पावसकर इतर ठिकाणी पर्यटनासाठी गेले. आणि त्याच दिवशी दुपारी हिंदूंवर हा हल्ला झाला. तिथल्या वातावरणामुळे मंगळवारी पहलगाम येथे पर्यटन करण्याचा त्यांची वेळ बदलली आणि त्या हल्ल्यातून पावसकर कुटुंब बारबार बचावले.
जम्मू काश्मीर येथील पर्यटनासाठी तळेरे येथील तनय सचिन पावसकर, मिहीर योगेश पावसकर, इशा योगेश पावसकर, साहिल सागर पावसकर, साक्षी संदीप पावसकर, ऋचा प्रमोद खेडेकर हे सहाजण गेले होते. तिथल्या वातावरणामुळे पर्यटनाची वेळ बदलली आणि आम्ही त्या हल्ल्यातून सुखरूप वाचलो. मात्र, त्या हल्ल्याची दाहकता आम्हाला जाणवत होती. विमानस्थळ आणि इतर सर्वच ठिकाणी हल्ल्यानंतर नागरिकांची धावपळ सुरू झाली. सुदैवाने विमानाची तिकीट मिळाली आणि गुरुवारी सकाळी आम्ही सुखरूप तळेरे गावी पोहोचलो. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी त्या सहाही जणांशी संवाद साधला आणि तिथली नेमकी परिस्थिती जाणून घेतली.
तळेरे येथील जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या पावसकर कुटुंबियांची भेटी दरम्यान पालकमंत्री नितेश राणे, डाॅ. मिलिंद कुलकर्णी, बाळा जठार, संतोष कानडे आदी उपस्थित होते.