महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज
कुणबी बांधवांसाठी विरार येथे ३ ऑगस्टला मनोमिलन कार्यक्रम

- कुणबी समाजोन्नती संघ, कुणबी युवा आणि कुणबी महिला मंडळाकडून ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ कार्यक्रमाचे आयोजन!
मुंबई: धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा मिळावा आणि समाजबांधणीसाठी पुन्हा एकदा सज्ज होता यावे या उद्देशाने कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, संलग्न कुणबी युवा मुंबई आणि कुणबी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जुन्या आणि नव्या सहकाऱ्यांचे मनोमिलन घडवून आणणे, गप्पा-टप्पा, मस्ती आणि मजा करत एक अविस्मरणीय दिवस घालवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
- दिनांक: रविवार, ३ ऑगस्ट २०२५
- स्थळ: पीस ऑफ नेचर रिसॉर्ट, विरार (प)
- प्रवेश फी: प्रत्येकी ५५० रुपये
कुणबी युवाकडे पूर्वनोंदणी करणाऱ्यांसाठी ही ५५० रुपयांची प्रवेश फी खालील सुविधांसह उपलब्ध असेल: - सकाळी चहा/नाश्ता
- दुपारी जेवण
- संध्याकाळी चहा
- ४ रूम्सची सुविधा
- विरार स्टेशनवरून पिकअप आणि ड्रॉपची सोय
विशेष टीप: कुणबी युवा हे एक कुटुंब असून, या कुटुंबाचा प्रत्येक सदस्य महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपल्या सहभागाशिवाय हे कुटुंब अपूर्ण आहे.
प्रवेश फी येथे पाठववी
आपली प्रवेश फी कुणबी समाजोन्नती संघाचे खजिनदार श्री. पांडुरंग दोडेकर यांच्या G-Pay क्रमांक ८६९३०२१०९२ या गुगल पे नंबरवर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. - या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुणबी समाजातील बांधवांना एकत्र येण्याची, जुन्या आठवणींना उजाळा देण्याची आणि नवीन स्नेहबंध जोडण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. चला तर मग, या ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ मध्ये सहभागी होऊन एक संस्मरणीय दिवस अनुभवूया आणि उज्वल समाजबांधणीसाठी पुन्हा एकदा सज्ज होऊया, असे आवाहन आले आहे आहे.