कृषिकन्यांकडून आबिटगाव येथे कीटकनाशकाची फवारणी

मांडकी पालवण : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण यांच्या विद्यार्थिनींनी आबिटगांव येथे 3 जुलै 2025 रोजी कीटकनाशकाची फवारणी केली . संतोष शिर्के यांच्या शेतातील नारळ व भात यावर कीटकनाशकाची फवारणी करत शेतकऱ्यांना माहिती सांगण्यात आली.
कीटकनाशकांची फवारणी कधी करावी व त्यामुळे त्याचे होणारे फायदे सांगण्यात आले. या संपूर्ण उपक्रमासाठी डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे , कृषी कार्यानुभव समन्वयक प्राध्यापक मोहिते सर यांचे मार्गदर्शन लाभले. हे प्रात्यक्षिक कृषीसंस्कृतीच्या विद्यार्थिनींनी घेतले. यामध्ये अमिषा कोळी, वृषाली गोफणे, साक्षी गुरव, सृष्टी काळे, प्रज्ञा गोठणकर, मृणाल उपाध्ये, दीक्षा खांडेकर, मयुरी ढेकळे, प्रीती पेरवी यांनी पुढाकार घेतला .
शेती करताना कीटकांचे नियंत्रण कसे करावे, हा या मागील उद्देश होता.