केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले रविवारी चिपळूण दौऱ्यावर
रत्नागिरी, दि. १ (जिमाका) : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
ना. आठवले यांच्या दौऱ्यानुसार रविवार ३ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२.२५ वाजता चिपळूण रेल्वे स्थानक येथे आगमन. दुपारी १ वाजता हॉटेल अभिरुची, ओझरवाडी, चिपळूण येथे राखीव. दुपारी १.१५ वाजता चिपळूण, जि. रत्नागिरी येथे दयानंद मोहिते फाऊंडेशनला भेट आणि फाऊंडेशच्या प्रतिनिधींशी संवाद. दुपारी १.३० वाजता बाळ माटे सभागृह, शासकीय विश्रामगृहाच्या समोर, चिपळूण येथे जनतेशी बैठक. दुपारी ३.१५ वाजता राखीव व शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथे समाजकल्याण अधिकाऱ्यांसमवेत बैठक. दुपारी ४.१५ वाजता शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथे पत्रकार परिषद. सायंकाळी ६.२० वाजता चिपळूण रेल्वे स्थानक येथून दादर, मुंबई कडे प्रयाण.