कोकण रेल्वेची वाहतूक लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
सीएमडी संतोष कुमार झा रिस्टोरेशनच्या कामावर लक्ष ठेवून
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर पेडणे येथील रेल्वेच्या भुयारी मार्गामध्ये रुळाच्या बाजूला जमिनीखालून बुडबुड्यांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागल्यामुळे या टनेलमधून होणारी रेल्वेची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. रेल्वे सेवा पूर्वस्थितीत आणण्यासाठी कोकण रेल्वेकडून घटनास्थळी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले आहे.
कोकण किनारपट्टीत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मडुरे ते पेडणे दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरील भुयारी मार्गामध्ये रुळाच्या बाजूला जमिनी खालून मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागल्यामुळे मंगळवारी आधी दुपारी रेल्वे सेवा बाधित झाली. रात्री ती सुरूही करण्यात आली मात्र, बुधवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा ही समस्या उद्भवल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर देशाच्या दक्षिणोत्तर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. राजधानी एक्सप्रेस मंगला एक्सप्रेससह काही सुपरफास्ट दूर पल्ल्याच्या गाड्यांचा यामध्ये समावेश आहे.
कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होत असल्यामुळे बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी हेल्पलाइन सुविधा उपलब्ध केली आहे.
BSNL क्र. 0832270648-श्री. सचिन देसाई, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे.
दरम्यान, पेडणे येथील बोगदामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होऊन रेल्वे सेवा बाधित झाल्याने कोकण रेल्वेच्या सीएमडी पदाचा कार्यभार अलीकडेच स्वीकारलेल्या श्री संतोष कुमार झा यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बुधवारी सकाळपासून गोव्यातील पेडणे येथील बोगद्यामध्ये खंडित झालेली रेल्वे सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी जातींविषयी घटनास्थळी उपस्थित आहेत. सीएमडी संतोष कुमार झा हे घटनास्थळी सुरू असलेल्या रिस्टोरेशनच्या कामावर जातींविषयी लक्ष ठेवून आहेत. लवकरात लवकर रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी कोकण रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, बुधवारी आणि गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे कोकण रेल्वे कडून तिकिटाचा तात्काळ परतावा देण्याचे काम रेल्वेच्या बुकिंग काउंटर्सवर सुरू आहे. याशिवाय प्रवासी व त्यांच्या नातेवाईकांना यासंबंधीची माहिती पुरवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांकही सुरू केला आहे.