कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेला २५ वर्षे पूर्ण ;आता थेट बुकिंग सुरू!

- कोलाड ते सुरतकल दरम्यान अखंड सेवा – ट्रक मालकांसाठी पर्यावरणपूरक व सोयीस्कर पर्याय
रत्नागिरी : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने 1999 मध्ये सुरू केलेल्या “रोल ऑन-रोल ऑफ” (RORO) सेवेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही सेवा ट्रक वाहतुकीसाठी एक पर्यावरणपूरक, सोयीस्कर आणि विश्वासार्ह पर्याय ठरली आहे.
थेट बुकिंगसाठी संपर्क करा
RORO सेवांचे मार्केटिंग आणि ऑपरेशनचे कंत्राट M/s. Anjana Trade and Agencies यांच्याकडे होते, परंतु 14 फेब्रुवारी 2025 रोजी हे कंत्राट संपुष्टात आले आहे. त्यामुळे सर्व ट्रक मालक आणि चालकांनी कोलाड आणि सुरतकल स्थानकांवरील बुकिंग कार्यालयात थेट संपर्क साधावा.
RORO सेवा का निवडावी?
✔ पर्यावरणपूरक आणि इंधन बचत करणारा पर्याय
✔ वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करणारी सुविधा
✔ वेळेची बचत आणि वाहतुकीस अधिक सुरक्षितता
✔ कोलाड ते सुरतकल अखंड सेवा
RORO सेवा नियमितपणे सुरू राहणार असून, अधिक माहितीसाठी आणि दर जाणून घेण्यासाठी www.konkanrailway.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी केले आहे.