ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकण रेल्वेसाठी प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली

रत्नागिरी दि. १४ ऑक्टोबर : कोकण रेल्वे प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान अनेक कामगार, कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दर वर्षी १४ ऑक्टोबर रोजी स्मृती दिन पाळला जातो. शनिवारी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकाबाहेर उभारलेल्या स्मृती स्तंभावर रेल्वेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली.

रत्नागिरी येथील रेल्वे स्थानकासमोरील स्मृती स्तंभावर कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, आरपीएफचे आय. जी. अंजनीकुमार सिन्हा, कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र कांबळे आणि कोकण रेल्वेचे कर्मचारी- अधिकारी यांच्या उपस्थितीत शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.