कोकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी!

- सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ४ एक्सप्रेस गाड्यांना रेल्वे बोर्डाकडून थांबे मंजूर
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी चार महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांचा फायदा मिळणार आहे. कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या चार प्रमुख एक्सप्रेस गाड्यांना आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाच्या दोन रेल्वे स्थानकांवर थांबे (Halts) मंजूर करण्यात आले आहेत.
थांबा मिळालेल्या एक्सप्रेस गाड्यांची यादी
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, खालील चार एक्सप्रेस गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबे देण्यात आले आहेत:
- एरनाकुलम ते अजमेर एक्सप्रेस (12977 / 12978)
- एरणाकुलम ते हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (22655 / 22656)
- हिसार – कोईमतुर एक्सप्रेस (22475 / 22476)
- गांधीधाम ते नागरकोइल एक्सप्रेस (16335 / 16336)
कोणत्या गाड्यांना कोणत्या स्थानकावर थांबा?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन प्रमुख रेल्वे स्थानकांवर या गाड्यांना थांबे मिळणार आहेत.

सिंधुदुर्ग आणि कणकवली प्रवाशांना थेट फायदा
या थांब्यांमुळे सिंधुदुर्ग आणि कणकवली परिसरातील लाखो प्रवाशांची सोय होणार आहे. आता त्यांना थेट दिल्ली (हजरत निजामुद्दीन), अजमेर, कोईमतुर आणि नागरकोइल सारख्या लांबच्या शहरांपर्यंत प्रवास करणे अधिक सुलभ आणि सोयीचे होणार आहे. कोकणातील पर्यटनाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही या निर्णयामुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे.





