ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
कोकण रेल्वे मार्गावरील तीन एक्सप्रेस गाड्या ठाणे, दादर स्थानकापर्यंत धावणार

मुंबई CSMT प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे रेल्वेकडून
रत्नागिरी : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने, मध्य रेल्वेने काही गाड्या ठाणे आणि दादर स्थानकांपर्यंतच चालवण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल ३१ मार्च २०२५ पर्यंत लागू राहणार आहे.
प्रभावित गाड्या पुढील प्रमाणे :
- १२१३४ मंगळूर जंक्शन – मुंबई CSMT एक्स्प्रेस ही गाडी ३१ मार्च २०२५ पर्यंत ठाणे स्थानकापर्यंतच धावणार आहे.
- २२१२० मडगाव जंक्शन – मुंबई CSMT तेजस एक्स्प्रेस ही गाडी ३१ मार्च २०२५ पर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहे.
- १२०५२ मडगाव जंक्शन – मुंबई CSMT जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी ३१ मार्च २०२५ पर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहे.
या बदलांमुळे प्रवाशांना काही अडचणी येऊ शकतात, त्यामुळे प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.