ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज

कोकण रेल्वे मार्गावरील नव्या गाडीचा उद्या शुभारंभ सोहळा

बोरिवली स्थानकात होणार उद्घाटन ; ३ सप्टेंबरपासून नियमित फेऱ्या

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या बांद्रा ते मडगाव या नव्या साप्ताहिक कायमस्वरूपी गाडीचा शुभारंभ दि. २९ ऑगस्ट रोजी दुपारी होणार आहे. याबाबत रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार उद्घाटनाच्या फेरीला दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी बोरिवली स्थानकातून मडगावसाठी हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईतील पश्चिम उपनगरातून कोकण रेल्वे मार्गावर नवीन गाडी सुरू होणार असल्याची चर्चा होती. अखेर बोर्डाने आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या वांद्रे टर्मिनस ते मडगाव (10115/10116) अशा कायमस्वरूपी गाडीला मंजुरी दिली आहे. या गाडीचा शुभारंभ सोहळा बोरिवली स्थानकात उद्या गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी होतो आहे.

या स्थानकांवर थांबणार नवी गाडी

बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी*, थिविम, करमाळी.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button