कोकण रेल्वे मार्गावरील या गाडीच्या फेऱ्या वाढविल्या
रत्नागिरी : गुजरातमधील अहमदाबाद ते गोव्यातील थीवीदरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या मार्गावरील पर्यटकांची संख्या वाढल्याने रेल्वेने या गाडीच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.अहमदाबाद ते थिवी मार्गावर 09412 /09411 या मार्गावर आठवड्यातून दोनदा धावणारी विशेष गाडी चालवली जात आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन अहमदाबाद -थिवी मार्गावर (09412) या गाडीच्या दि. ५ व ८ जानेवारी २०२५ रोजी तर थिवी ते अहमदाबाद मार्गावर या विशेष गाडीच्या (09411) दिनांक ६ व ९ जानेवारी २०२५ रोजी विस्तारित फेऱ्या होणार आहेत.
अहमदाबाद ते थिवी मार्गावर 09412 /09411 या मार्गावर आठवड्यातून दोनदा धावणारी विशेष गाडी चालवली जात आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन अहमदाबाद -थिवी मार्गावर (09412) या गाडीच्या दि. ५ व ८ जानेवारी २०२५ रोजी तर थिवी ते अहमदाबाद मार्गावर या विशेष गाडीच्या (09411) दिनांक ६ व ९ जानेवारी २०२५ रोजी विस्तारित फेऱ्या होणार आहेत.