कोकण रेल्वे मार्गावर १८ जानेवारीला दोन वेगवेगळ्या भागात ‘मेगाब्लॉक’

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी कुमटा ते कुंदापुरा तसेच कुंदापुरा ते नंदीकूर या भागांमध्ये दोन मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत. यापैकी पहिला मेगाब्लॉक तीन तासांचा तर दुसरा दोन तासांचा असेल.
या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार कुमटा ते कुंदाकूर या भागात दुपारी 12 ते सायंकाळी तीन और कुंदापुरा ते नंदीकूर या सेक्शन मध्ये दुपारी सव्वा बारा ते सव्वा दोन असा दोन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणाऱ्या या मेगाब्लॉकमुळे पनवेल ते नागरकोईल तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. याचबरोबर मेगा ब्लॉक चालणाऱ्या भागातून नेहमी धावणाऱ्या दोन गाड्या शॉर्ट टर्मिनेट / अंशत : रद्द केल्या जाणार आहेत.