कोकण रेल्वे मार्गावर २५ जुलैला मेगाब्लॉक
तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते आरवली दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दिनांक 25 जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर खेड ते आरवली स्थानकादरम्यान देखभालीच्या कामासाठी दिनांक 25 जुलैला दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळच्या चार वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
या गाड्या थांबवून ठेवल्या जाणार
मेगाब्लॉकमुळे 02197
कोईमतुर -जबलपूर ही दिनांक 24 जुलैला प्रवास सुरू होणारी विशेष गाडी मडगाव ते संगमेश्वर दरम्यान सुमारे अडीच तास थांबवून ठेवली जाईल.
गाडी क्रमांक 10106 सावंतवाडी रोड -दिवा एक्सप्रेस ही दिनांक 25 रोजी प्रवास सुरू होणारी गाडी सावंतवाडी ते संगमेश्वर दरम्यान २ तास रोखून जाणार आहे.
गाडी क्रमांक 10104 मडगाव मुंबई मांडवी एक्सप्रेस रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान एक तास थांबवून ठेवली जाईल.