कोकण रेल्वे मार्गावर ५ एप्रिलपासून अतिरिक्त फेऱ्या

मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मुंबई (CSMT) आणि मडगाव दरम्यान अतिरिक्त विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चाकरमान्यांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ट्रेन क्रमांक ०१०१९ / ०१०२० मुंबई CSMT – मडगाव – मुंबई CSMT विशेष (साप्ताहिक)
१. ट्रेन क्र. ०१०१९ मुंबई – मडगाव स्पेशल:
- कालावधी: ५ एप्रिल २०२६ ते ७ जून २०२६ पर्यंत.
- वेळ: दर रविवारी मध्यरात्री ००:५५ वाजता मुंबई CSMT वरून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.
२. ट्रेन क्र. ०१०२० मडगाव – मुंबई स्पेशल:
- कालावधी: ५ एप्रिल २०२६ ते ७ जून २०२६ पर्यंत.
- वेळ: दर रविवारी दुपारी १६:०० वाजता मडगाव जंक्शनवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:५० वाजता मुंबई CSMT ला पोहोचेल.
प्रमुख थांबे (Halts)
ही विशेष ट्रेन प्रवाशांच्या सोयीसाठी कोकणातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे:
दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी.
कोचची रचना (Train Composition)
एकूण २२ डब्यांच्या या ट्रेनमध्ये खालीलप्रमाणे व्यवस्था असेल:
- २ टायर एसी: ०१ कोच
- ३ टायर एसी: ०६ कोच
- स्लीपर क्लास: ०९ कोच
- जनरल (सामान्य): ०४ कोच
- SLR: ०२ कोच
बुकिंग कधी सुरू होणार?
ट्रेन क्रमांक ०१०२० साठी बुकिंग १ एप्रिल २०२६ पासून सर्व प्रवासी आरक्षण केंद्रांवर (PRS), इंटरनेट आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर सुरू होईल.
प्रवाशांनी अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा कोकण रेल्वेचे ‘KR Mirror’ ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.





