ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल

कोकण रेल्वे मार्गे धावणार वास्को-मुजफ्फरपूर विशेष ट्रेन


रत्नागिरी :   उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. गोव्यातील वास्को द गामा ते बिहारमधील मुजफ्फरपूर दरम्यान साप्ताहिक विशेष एक्सप्रेस (गाडी क्रमांक ०७३११/०७३१२) चालवण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे.

कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या या गाडीचा तपशील पुढील प्रमाणे

  • गाडी क्रमांक ०७३११: वास्को द गामा – मुजफ्फरपूर साप्ताहिक एक्सप्रेस, वास्को द गामा येथून दर सोमवारी १६:०० वाजता सुटेल. ही गाडी ०७/०४/२०२५ ते ०२/०६/२०२५ या कालावधीत धावेल आणि तिसऱ्या दिवशी १२:३० वाजता मुजफ्फरपूरला पोहोचेल.
  • गाडी क्रमांक ०७३१२: मुजफ्फरपूर – वास्को द गामा साप्ताहिक एक्सप्रेस, मुजफ्फरपूर येथून दर गुरुवारी १४:४५ वाजता सुटेल. ही गाडी १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीत धावेल आणि तिसऱ्या दिवशी १४:५५ वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.
    थांबे:
  • ही रेल्वे मडगाव जंक्शन, थिवीम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, खंडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल.
    गाडीची रचना:
  • या गाडीमध्ये एकूण २० एलएचबी डबे असतील. ज्यात १ द्वितीय वातानुकूलित (२ टियर एसी), ५ तृतीय वातानुकूलित (३ टियर एसी), १२ शयनयान (स्लीपर) डबे, १ जनरेटर कार आणि १ एसएलआर डब्यांचा समावेश आहे.
  • हे सुद्धा वाचा : Konkan Railway : तीन एक्सप्रेस गाड्या ठाणे, दादरपर्यंत
  • Konkan Railway |  आठ रेल्वे स्थानकांवर उभारणार विशेष अतिथी कक्ष!

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button