कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करु

- जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा
रत्नागिरी, दि. 23 : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी मतदारांसाठीची प्रतिज्ञा घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. नायब तहसिलदार दीपक चव्हाण यांनी ही प्रतिज्ञा उपस्थितांना दिली.
“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत
निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.”
उपजिल्हाधिकारी(रोहया) हर्षलता गेडाम यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





