खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नाने शिरगाव-चिपळूण रेल्वे स्थानक एसटी सेवा पुन्हा सुरू

रत्नागिरी : शिरगाव ते चिपळूण रेल्वे स्थानकापर्यंत परिवहन मंडळाची बस सेवा सुरू व्हावी म्हणून गेल्या वर्षभरापासून ग्रामस्थांकडून होत असलेल्या मागणीला खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्यामुळे यश आले असून आता शिरगाव ते चिपळूण रेल्वेस्थानक एस टी बस सुरू होणार आहे.
चिपळूण शिरगाव येथील ग्रामस्थांकडून गेली वर्षभर चिपळूण शिरगाव ते रेल्वेस्थानक या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू व्हावी म्हणून मागणी होत होती. याबाबत तेथील ग्रामस्थ सूरज शिंदे यांनी ही बाब रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार नारायण राणे यांच्याकडे लेखी स्वरुपात लक्षात अजून दिली. खा. श्री. राणे यांनी यात लक्ष घालून शिरगाव ते चिपळूण रेल्वे स्टेशन बस सुरू व्हावी म्हणून प्रयत्न केले. रत्नागिरी संपर्क कार्यालयाकडून विभाग नियंत्रकांशी संवाद साधला. चिपळूण शिरगांव ते रेल्वेस्थानक मार्गावर दिवसभरात ११ गाड्यांच्या विभाग नियंत्रक प्रथमेश बोरसे यांनी मंजूरी देऊन चिपळूण आगार व्यवस्थापकांना निर्देश दिले आहेत.
वर्षभरानंतर खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नाने एसटी बस सेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी त्यांच्यासह विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांचे आभार मानले आहेत.