खुशखबर !!! लांजातील फणस संशोधन केंद्राला अखेर चालना
चिपळूण संगमेश्वरचे आ. शेखर निकम यांनी मंजुरीसाठी मांडला पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव
लांजा : लांजातील फणस संशोधन केंद्राला रखडलेल्या प्रस्तावाला अखेर चालना मिळाली असून चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी चालू पावसाळी अर्थसंकल्पी अधिवेशनात ४० कोटीचा फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव मंजूर व्हावा ही मागणी विधानसभा पावसाळी अधिवेशनात प्रकाशाने मांडली आहे.
लांजा येथे ४० कोटीचा फणस संशोधन केंद्र प्रस्ताव कोकण कृषी विद्यापीठाने राज्य शासनाला यापूर्वीच सादर केला आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्याप निधीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. रखडलेल्या या प्रस्तावबाबत लांजातील पत्रकार परिषदेचे सिराज नेवरेकर यांनी आमदार शेखर निकम आणि आमदार डॉ. राजन साळवी यांच्याशी या संदर्भात संपर्क साधून रखडलेल्या फणस संशोधन केंद्र बाबत निधी उपलब्ध व्हावा, यासाठी मागणी येथील शेतकऱ्यांच्या मागणी संदर्भात कैफियत मांडली होती.
काल बुधवारी अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनामध्ये महायुती सरकारने सर्वसमावेशक मांडलेल्या अर्थसंकल्पाला पाठिंबा देत असताना कोकणातील काही ठळक मुद्दे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी मांडले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर येथे NEPC सेंटर व विज्ञानविषयक लायब्ररी सुरू करण्यास पाठिंबा द्यावा, शासन मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत देण्यात येणार आहे, हे अभिनंदनीय बाब असून वर्ष दोन वर्षापूर्वी प्रवेश घेतलेल्या मुलींना देखील त्याचा लाभ मिळावा, महात्मा गांधी जन आरोग्य योजनेची व्याप्ती रुपये दीड लाख वरून रुपये पाचलाखपर्यंत वाढविलेल्या क्रांतीकार्य निर्णयाबद्दल सरकारचे त्यांनी अभिनंदन केले.
कोकणात बांबू लागवढीसाठी प्राधान्य द्यावे व खैर वृक्ष लागवडीसाठी विशेष योजना राबवावी, त्याचप्रमाणे लांजा येथील फणस संशोधन केंद्र मंजूर व्हावे. कोकणातील नमन, जाखडी व खेळे या कलाकारांना मानधन व पेंशन मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, चिपळूण, खेड व राजापूर येथील नंद्यांना पावसाळी येणाऱ्या पूर नियंत्रणासाठी निधी उभारावा, संगमेश्वर तालुक्यातील गडनदी व गडगडी नदी लघु पाटबंधारे प्रकल्पातून पाईप लाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे, कोकणातील डोंगराळ भागातील धनगर समाजाचे पुनर्वसन व्हावे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत गट प्रवर्तक यांच्या मानधनात वाढ व्हावी, सन 2001 साली परवानगी दिलेल्या व मूल्यांकन झालेल्या सिनियर कॉलेज यांना अनुदान देणेत यावे या मागण्या चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी सभागृहात केल्या.
लांजामधील फणस संशोधन केंद्राबाबत राज्य सरकारने कोणता निर्णय घेतला आहे, यावर टिप्पणी या पावसाळी अधिवेशनात होणार आहे.