ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : खेडचे माजी नगराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर यांनी मंगळवारी अनेक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या पक्ष प्रवेशानंतर श्री. वैभव खेडेकर यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांचे व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष केदार साठे, सुबोध जाधव, संतोष नलावडे, मनीष खवळे, मिलिंद नांदगावकर, संजय आखाडे, नंदू साळवी, रवींद्र नांदगावकर, मितेश शहा, वसंत पिंपळकर, देवेंद्र खैर आदी उपस्थित होते.