गांधीधाम एक्सप्रेस विद्युत इंजिनसह आज प्रथमच कोकण रेल्वे मार्गावर!
गांधीधाम ते नागरकोईल मार्गावर २६ जानेवारीच्या फेरीपासून विजेवर धावणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी लांब पल्ल्याची आणखी एक एक्सप्रेस गाडी विद्युत इंजिनचा धावू लागली आहे. डिझेल इंजिन ऐवजी विद्युत इंजिनवर धावणारी ही साप्ताहिक नियमित गाडी आज प्रथमच कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे.
कोकण विचार संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या बहुतांश प्रवासी रेल्वे गाड्या आता डिझेल इंजिनऐवजी विद्युत इंजिन जोडून धावत आहेत. आता केवळ काही रेल्वे गाड्याच डिझेल इंजिनवर धावत आहेत. त्यांच्यासाठी देखील विद्युत इंजिन उपलब्ध होताच त्या देखील नजीकच्या काळात या उर्वरित गाड्या देखील विजेवर धावणार आहेत.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार नागरकोईल ते गांधीधाम दरम्यान धावणारी एक्सप्रेस (16336) दिनांक 23 जानेवारी 2024 च्या विजेवर धावू लागली आहे. या गाडीला विद्युत इंजिन जोडल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरून ती बुधवारी ( दिनांक 24 जानेवारी ) कोकण रेल्वे मार्गावर येणार आहे.
गांधीधाम ते नागरकोईल (16335) या प्रवासात या गाडीला दिनांक 26 जानेवारी 2024 च्या फेरीपासून विद्युत इंजिन जोडले जाणार आहे.
गोवा-महाराष्ट्रातील या स्थानकांवर थांबते गांधीधाम एक्सप्रेस
भारताच्या दक्षिण टोकाकडील तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकोईल जंक्शन वरून निघणारी ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर आल्यानंतर मडगाव, सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, माणगाव, पनवेल, भिवंडी रोड, वसई रोड, बोईसर ही गोवा तसेच महाराष्ट्रातील स्थानके घेत तिचा प्रवास गुजरातला गांधीधाम जंक्शनला संपतो.