गांधी, शास्त्री जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता सप्ताहाचा समारोप
- बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्र,नेहरु युवा केंद्रातर्फे 2 ते 8 ऑक्टोबर स्वच्छता सप्ताह उपक्रम
रत्नागिरी : प. पू. बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्र खेडशी आणि नेहरु युवा केंद्र, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त 2 ते 8 ऑक्टोबर स्वच्छता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता सप्ताहाचा रविवारी ग्रामीण पोलीस स्टेशन कारवांचीवाडी रत्नागिरी येथील परिसर स्वच्छ करुन समारोप करण्यात आला.
या सप्ताहात व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मूलन, पर्यावरण संतुलन, व्यक्तिगत अध्यात्मक साधना, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मता आरोग्य शिबीर, होतकरु विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ, रक्तदान शिबीर, बचत संकल्पना प्रतिमहिना मेळावा असे प्रबोधनाचे कार्यकम रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते.
या समारोप कार्यक्रमावेळी डीवायएसपी विनीत चौधरी यांनी कारवांचीवाडी पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता राबवल्याबद्दल व्यसनमुक्ती केंद्राचे बाळ सत्यधारी महाराज यांचा सत्कार केला.
या कार्यकमाला पोलीस उपनिरीक्षक मिरा महामुनी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय शिवगण, दांडेआडोमचे सरपंच कैलास तांबे, दांडेआडोमचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रवीण तांबे, मिरजोळे ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य राहुल पवार, चंद्रकांत जोशी, उपेंद्र दहिवळकर, भागवत जाधव, आप्पा चव्हाण, संतोष कदम, उदय कदम, जयवंत ठावरे, पशांत जोशी, सुरेश नवले, संतोष शिंदे, महेंद्र खापरे, पदीप खापरे, रमेश केदार, मंगेश म्हादिये, अशोक बोंबले, अरविंद माने, सुनील मालप, केशव होरंबे, राजन नागवेकर, सुहास रांबाडे, सत्यराज पवार, विनोद घवाळी, बाळकृष्ण ठिक, विलास पाटील, संजय सोलकर आदी उपस्थित होते.
या समारोपाप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक मिरा महामुनी म्हणाल्या, व्यसनमुक्ती करणारी प्रथमच संस्था पाहिली. एवढी सामाजिक कार्य करणा-या या संस्थेला आमचा पाठींबा असेल असे त्यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक संजय शिवगण म्हणाले की, मुलांनी वाईट मार्गाला न जाता चांगल्या मार्गावर जाणे महत्वाचे आहे. बाळ सत्यधारी यांचे समाज कार्य आम्ही जवळून पाहिले आहे, अशा व्यक्तींची आज देशाला गरज आहे, त्यामुळे मुले व्यसनाधिन होणार नाहीत असे ते म्हणाले.
सोमवार 2 ऑक्टोबर रोजी स. 9 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे स्वच्छता अभियान व महात्मा गांधी सप्ताहाचे उद्घाटन करुन या सप्ताला सुरुवात झाली. बुधवार 4 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय हायस्कूल खेडशी येथे व्यसनमुक्ती पबोधन व स्वच्छता अभियान राबवण्यात आले. शुकवार 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. आयटीआय रत्नागिरी येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. रविवार 8 ऑक्टोबर रोजी कारवांचीवाडी पोलीस स्टेशन परिसरातील स्वच्छतेने कार्यकमाचा समारोप करण्यात आला.