गेटवे ऑफ इंडिया येथील गर्दी होणार कमी

- गेटवे ऑफ इंडिया जवळच उभारली जाणार पर्यटन जेटी
मुंबई : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गेट वे ऑफ इंडिया येथील गर्दी कमी करण्यासाठीआता या परिसरात पर्यटन जेटी उभारण्यात येणार आहे. राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात नियोजित जेटीच्या ठिकाणाची पाहणी केली.

गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लबजवळ ही पर्यटन जेटी उभारली जाणार आहे. या नवीन जेटी परिसराची मंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामाची सविस्तर माहिती व सद्यस्थिती जाणून घेतली.
पर्यटन दृष्ट्या उपयुक्त या जेटीचे काम लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, लागणाऱ्या सर्व विभागांच्या परवानग्या लवकरात लवकर मिळवाव्यात, या दृष्टीने ना नितेश राणे यांनी आढावा घेतला या नवीन जेटीमुळे सध्याच्या गेटवे ऑफ इंडिया जेटीवरील ताण कमी होणार आहे. याचा विचार करून याचे काम दर्जेदार आणि सर्व सोयींनी युक्त करावे अशा सूचनाहीत्यांनी दिल्या.
यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता पी. प्रदीप व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.