गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचा नांदगाव येथे मार्गदर्शन कार्यक्रम
चिपळूण : आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम व त्यापासून बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम डॉ बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांनी राबविला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविका कु. योगिराज कुंभार यांनी केले . तसेच अंमली पदार्थांचे व्यसन हा एक असा आजार आहे जो तरुण पिढीवर सतत परिणाम करत आहे. तरुणांचा मोठा वर्ग दारू, सिगारेट, तंबाखू, अंमली पदार्थ यांसारख्या विषारी पदार्थांच्या आहारी जात आहे. त्यामुळे अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची वेळीच माहिती असणे आवश्यक आहे. अंमली पदार्थांचा गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करी विरुद्ध दरवर्षी २६ जून हा दिवस अंमली पदार्थांच्या दुरुपयोगमुक्त जगासाठी कृती आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो अशी माहिती कृषिदूत कु. रुपेश भगत यांनी दिली. सहा. शिक्षक मा.आर. बी. शेवाळे सर यांनी व्यसनाचे कुटुंबावर, समाजावर होणारे दुष्परिणाम समजावले, या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. के. मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते व सहा. शिक्षक श्री. आर. बी. शेवाळे , श्री. एस. व्ही. धनवडे सर , सौ. ए. ए. शेंबेकर, सौ. पी. डी. जाधव मान्यवर म्हणुन लाभले.
तसेच हा कार्यक्रम कृषि-रत्न चे विद्यार्थी कु. ऋषिकेश पवार ,कु. केदार पाटील , कु. प्रथमेश मगदूम , कु. संकेत खरात , कु. प्रतीक माळी, कु. प्रथमेश शिखरे , कु. नागेश रक्ते, कु.अनिकेत पाटील , कु. साहिल पेंगरकर, कु. आकाश नायर ,कु. आशिष श्रीकुमार यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला.