गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली झेंडूची यशस्वी लागवड
माखजन : डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संगमेश्वर तालुक्यातील कासे येथे केलेल्या ‘झेंडू’ च्या यशस्वी लागवडीने परिसरात नवीन आशा निर्माण केली आहे. हा प्रकल्प महाविद्यालयाच्या ग्रामीण कार्यानुभव या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आला होता.
या प्रकल्पाच्या यशस्वीतेमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीची प्रशंसा केली जात आहे. महाविद्यालयाने त्यांच्या या यशस्वी उपक्रमाची दखल घेतली असून, भविष्यात अशा प्रकारच्या प्रयोगात्मक प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याची योजना आखली आहे.
‘झेंडू’ च्या यशस्वी लागवडीचा अनुभव इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. हा उपक्रम कासे गावचे ग्रामस्थ व उद्योजक श्री. रुपेश गोताड यांच्या शेतात राबविण्यात आला.
या यशस्वी प्रकल्पामुळे कृषी शिक्षणाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला एक नवा दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिल कांबळे व नितीन मेथे यांनी मार्गदर्शन केले आणि त्याचबरोबर त्यावेळी कृषी संघाचे अध्यक्ष शुभम गायकवाड व यश जाधव, ओंकार बोधगिरे,अथर्व गावडे, महेश पाटील, सौरभ गरुड, शंतनू पवार,रुझान मुलानी, राजवर्धन पाटील, विश्वजीत जाधव, शुभम पाटील, प्रणव जांभळे आदी उपस्थित होते.