घरगुती मत्स्यालय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीच्या वर्धापनदिनानिमित्त उपक्रम
रत्नागिरी : सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी यांच्या ६४ व्या वर्धादिनानिमित्त घरगुती मत्यालय फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी घरगुती मत्स्यालयाचे एकूण दोन फोटोग्राफ पाठवायचे आहे. एक फोटोग्राफ मत्स्यालयाचे जवळील दृश्य (view) व दुसरा फोटोग्राफ मत्स्यालयाबरोबर घरातील सभोवतालचे दृश्य (view) दाखविणारा असावा. उत्कृष्ट पाच फोटोग्राफ निवडले जातील.
स्पर्धा विजेत्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात येतील व त्यांचे फोटोग्राफ सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथील मत्यालयात लावण्यात येतील. आयोजकांचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धकांनी आपल्रे फोटोग्राफ्स तसेच नाव व पत्ता mbrsrtn@dbskkv.ac.in ई- मेल वर व ९४२२०७५६६४ या क्रमांकावर पाठवाव्यात.
जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन वरिषष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी यांनी केले आहे.