महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण

चिपळूणच्या युनायटेड गुरुकुलमध्ये प्रसिद्ध रांगोळीकार संतोष केतकर यांची मुलाखत कार्यक्रम

चिपळूण : गुरुकुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा पंचकोशातून व्यक्तीमत्व विकास घडावा अशा उद्देशाने अध्ययन अध्यापनाचे काम उपक्रमांची जोड देऊन चालत असताना अनेक निरनिराळे प्रयोग गुरुकुलमध्ये केले जातात.अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची साखळी यासाठी वर्षभरासाठी निश्चित केली जाते.यातीलच एक उपक्रम म्हणजे निवासी शिबिर. एक दिवसीय निवासी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापलीकडचा काहीतरी अनुभव द्यावा अशा उद्देशाने शाळेतच वस्तीचा एक दिवस ठरवला जातो. या शैक्षणिक वर्षातील गुरुकुलचे पहिले निवासी शिबिर शनिवार दिनांक २९ जून २०२४ रोजी संपन्न झाले.

अध्यापकांचा वर्षारंभ कार्यक्रम आणि चिपळूण मधील कलेवर नितांत प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व प्रतीथयश व्यावसायिक उद्योजक श्री.संतोष केतकर यांची व्यक्तीपरिचय उपक्रमा अंतर्गत मुलाखत असे स्वरूप निवासी वर्गाचं होतं.इयत्ता सातवी ते नववी मधील विद्यार्थ्यानी श्री.संतोष केतकर यांच्या कार्याचा थोडा पूर्वअभ्यास करून तयार केलेल्या प्रश्नावलीच्या आधारे ही मुलाखत संपन्न झाली.

लहानपणापासून आणि शाळेतील कलाशिक्षक श्री.धुरी सर यांच्या सहवासातून निर्माण झालेली आपली चित्रकलेची आवड जोपासत,नंतर चित्रकला याच विषयाशी संबंधित छत्र्यांवर नावं लिहून देण्यापासूनचे विविध छोटे मोठे व्यवसाय करत करत आता डिजिटल प्रिंटिंग क्षेत्रातील चिपळूण मधलं नावाजलेलं नाव आणि व्यवसाय सांभाळत आपल्या चित्रकलेची रांगोळीची आवड जपत प्रतिबिंब रांगोळी त्रिमिती रांगोळी चलतचित्र रांगोळी असे अद्भुत अभूतपूर्व प्रयोग करून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमाची नोंद करणारे रांगोळीकार म्हणजे संतोष केतकर यांच्या साधेपणाचा,अभ्यासू असण्याचा, चिकाटी व संयमी वृत्तीचा परिचय मुलांना त्यांच्या सोबतच्या प्रत्यक्ष सहवास आणि संवादातून अनुभवता आला.


त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना रियाज सरावातील सातत्य, रेखाटनाचे महत्त्व, एखादी गोष्ट सुचण्याची प्रक्रिया कशी घडते याविषयी विस्तृतपणे उलगडून सांगितले.त्यांच्या प्रसिद्ध कलाकृतींविषयी नेमकेपणाने माहिती सांगताना अजून आयुष्यातली अविस्मरणीय कलाकृती घडावयाची बाकी आहे असे नम्रपणे सांगितले.उत्तम कामासाठी सतत निरीक्षण करण्याची प्रवृत्ती,दुसऱ्यातील चांगले ते घेण्याची सवय, सचोटीने काम करायची सवय त्यामुळे व्यवसायातील आणि करु त्या कामातील विश्वासार्हता आपोआप निर्माण होते त्यामुळे हे गुण अंगी असावेत या साठी प्रयत्न करा असे मुलांना सुचवले. आपल्याकडे असणारी कला दुसऱ्याला देण्याने समृद्ध होत असते वाढत असते म्हणून या संकल्पनेतूनच लहान मुलांसाठी गणपती कार्यशाळा, चित्रयज्ञ अशा उपक्रमांचा नेतृत्व करताना त्यानिमित्ताने अनेक कलाकार मंडळी जोडले गेल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्या पालक प्रतिनिधींची उपस्थिती ही या कार्यक्रमासाठी होती. प्रशालेच्या गुरुकुलातील अध्यापक श्री.पराग लघाटे यांनी केलेले श्री.संतोष केतकर यांचे व्यक्तिचित्र मुख्याध्यापिका सौ.स्वप्नाली पाटील मॅडम यांच्या हस्ते यानिमित्ताने श्री.केतकर यांना गुरुकुलातर्फे भेट देण्यात आले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button