महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

चिपळूणमध्ये तांबी येथील धरणात तरुण शेतकरी बुडाला

  • गुरे धुण्यासाठी गेला असता घडली घटना
  • गुढीपाडवा दिनी लटके कुटुंबीयांवर काळाचा घाला

चिपळूण : रामपूर-तांबी धरणात गुरे धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रतिक अजय लटके (३०, भालघर) असे त्याचे नाव आहे. गुढीपाडव्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक हा रविवारी तांबी धरणात नेहमीप्रमाणे गुरे धुण्यासाठी गेला होता. यावेळी बैलाला बांधलेली दोरी सुटल्याने त्याचा तोल गेला व तो पाण्यात बुडाला. याचीं माहिती मिळताच ग्रामस्थांनी येथे धाव घेतली. त्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्याचा धरणात शोध घेण्यासाठी नगर परिषदेकडे बोट मागण्यात आली. त्यानुसार मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांनी बोट चालक शौकत गोलंदाज, नगर परिषदेचे कर्मचारी जयंत कासार आदींना यंत्रणा घेऊन पाठवले. त्यानुसार शोध घेण्यात आला असता सायंकाळी प्रतिक याचा मृतदेह सापडला. याची पोलीस ठाणेत नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

हे देखील वाचा : Konkan Railway |  रत्नागिरी ते उरणच्या जेएनपीटी बंदरात कंटेनर मालवाहतूक सेवा

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button