ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
चिपळूण-कऱ्हाड रेल्वे मार्गासंबंधी पुढील आठवडाभरात बैठक

रत्नागिरी : चिपळूण-कऱ्हाड रेल्वे मार्गासंदर्भात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
बैठकीत लोखंड रेल्वे अन्याय निवारण समितीचे प्रमुख शौकत भाई मुकादम हे चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गाचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले आहे.
कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम गेले अनेक दिवस चिपळूण-कराड रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करत आहेत.
याआधी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या कारकीर्दीत चिपळूण कराड रेल्वे मार्ग उभारण्याच्या दृष्टीने गती आली होती. मात्र रेल्वे महामार्गाच्या भूमिपूजनापर्यंत पोहोचलेला हा प्रकल्प बारगळला. यामुळे आता यासाठी नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत.