महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्स

चिपळूण संगमेश्वरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीतच प्रमुख लढत

एकूण सहा उमेदवार निवडणुक रिंगणात

देवरूख (सुरेश सप्रे) : २६५ – चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदार संघात दाखल झालेल्या एकूण ८ पैकी दोन उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवशी मागे घेतल्याने चिपळूण विधानसभा मतदार संघात आता एकुण सहा उमेदवार निवडणुक रिंगणात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

शेखर निकम

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार शेखर निकम (घड्याळ ) तर राष्ट्रवादी पवार शरद गटाकडुन प्रशांत यादव ( तुतारी वाजवणारा माणूस ) या दोन तगड्या उमेदवारांमध्येच चिपळूण विधानसभेची थेट लढत होणार हे निश्चित झाले आहे

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांचा पराभव झाला होता . मात्र यावेळी हा विधानसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्याने शिवसेनेकडून इच्छुक असलेले माजी आमदार व उपनेते सदानंद चव्हाण यांचे स्वप्न भंगले.

प्रशांत यादव

त्यामुळे ते नाराज असल्याने त्यांचा फायदा नक्की कुणाला होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागुन राहील्या आहेत .

२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणाऱ्या या निवडणुकीत प्रशांत यादव व शेखर निकम या नावाशी सार्धंम्य असलेले उमेदवार निवडणुक निवडणुक रिंगणात उभे आहेत . यावेळी एकुण ८ उमेदवारानी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते . त्यातील सुनिल शांताराम खंडागळे, नसिरा अब्दुल रहिमान काझी या दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे तर गाव विकास समितीच्यावतीने अपक्ष म्हणून सौ. अनघा कांगणे या एकमेव महिला उमेदवार रिंगणात आहेत.

विधानसभा निवडणुक – २०२४

  • 265- चिपळूण विधानसभा मतदार संघ*
  • १)- प्रशांत बबन यादव – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार-( तुतारी वाजवणारा माणूस,)
  • २) शेखर गोविंदराव निकम- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – (घड्याळ,)
  • ३) सौ. अनघा राजेश कांगणे – अपक्ष (-शिट्टी) ,
  • ४) प्रशांत भगवान यादव- अपक्ष-( ट्रम्पेट,)
  • ५) महेंद्र जयराम पवार – अपक्ष – (माईक,)
  • ६) शेखर गंगाराम निकम- अपक्ष – (फुलकोबी)

admin

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button