चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटलचा सुवर्णप्राशन डोसने शुभारंभ

चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण या संस्थेच्या नव्याने सुरू झालेल्या चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटलच्या ओपीडीचा दिनांक २७ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता शुभारंभ झाला. संस्थेचे संस्थापक डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या शुभहस्ते धन्वंतरीच्या प्रतिमेची पूजा व हार अर्पण करून हॉस्पिटलच्या ओपीडी ची सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ० ते १२ वयोगटातील मुला मुलींसाठी सुवर्णप्राशन डोसने सुरुवात केली. यावेळी पहिला डोस कुमार अविनाश राजेंद्र झिंगे याला देण्यात आला.
चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटल, मांडकी पालवण तर्फे असे वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दिनांक ६ जुलै २०२५ पासून गावोगावी जाऊन तपासणी व सल्ला शिबीर घेण्यात यावेत व ग्रामीण भागापर्यंत वैद्यकीय सेवा पुरविण्यात यावी असे डॉ. चोरगे यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. या दिवशी सुमारे 75 लहान मुला मुलींनी दिवसभरात सुवर्णप्राशन डोस घेतले.
शुभारंभ प्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉक्टर तानाजीराव चोरगे, संस्थेच्या संचालिका सौ अंजलीताई चोरगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव गांगण व डॉ. गौरी कदम, संस्थेचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.